प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - तालुक्यातील मौजा दहेली गावाजवळ 29 ऑक्टोम्बरला महाराणा प्रताप वार्ड निवासी 32 वर्षीय अविनाश इदनूरी यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की दहेली गावाजवळील जंगल शिवारातील भागीरथी नाल्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून तो मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आहे व मृतदेह हा कुजलेल्या स्थितीमध्ये असून मृतकाचे वय अंदाजे 40 वर्ष जवळपास आहे.मृतकाची उंची 5 फूट 4 इंच, मध्यम बांधा, सावळा रंग, अंगावर कॉलर नसलेली काळसर रंगाची हाफ टीशर्ट, लाल रंगाचा पॅन्ट असून सदर वर्णनाचा अनोळखी मृतदेहाचा पत्ता व नातेवाईक मिळून आल्यास बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन बल्लारपूर पोलिसांनी केले आहे.
