मूल (प्रतिनिधी/गुरू गुरनुले) येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य तथा प्रसिध्द किराणा व्यापारी मोतीलाल टहलीयानी यांच्या सुविद्य सहचारीणी आणि चंद्रपूर येथील प्रसिध्द व्यापारी आणि विविध क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहरलाल टहलीयानी आणि राज्याचे लोकायुक्त न्यायमुर्ती मदनलाल टहलीयानीयांच्या भावसुन सौ. भावना मोतीलाल टहलीयानी (५६) यांचे कर्करोगाने cancer आज पहाटे येथील राहत्या घरी निधन झाले. स्व. भावना टहलीयानी ह्या येथील रामदेवबाबा ramdev baba योग प्रशिक्षण वर्गाच्या शिक्षिका म्हणुन सेवारत होत्या. आज दुपारी ३ वा. स्थानिक उमा नदी काठावरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी सिंधी समाजा शिवाय इतर समाजातील आप्तस्वकीय आणि राजकारणी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. भावना टहलीयानी यांचेवर नागपूर येथील खाजगी रूग्णालयात मागील कित्येक महीण्यांपासुन उपचार सुरू होते. कालच संध्याकाळी त्यांना डाँक्टरांच्या सल्याने येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यांचे पश्चात पती, दोन मूल, दोन स्नुषा, भासरे, दिर असा मोठा टहलीयानी परीवार आहे.
