सावली - विद्यार्जनाचे महान कार्य करणारे शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेत ड्युटी बजावत असतांना सभापतीच्या भेटीत आढळल्याने शिक्षकावर पाथरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. उसरपार तुकुम जिल्हा परिषद शाळेतील दिलीप ढोक या शिक्षकाची सभापती विजय कोरेवार यांनी तक्रार केली आहे. Drunken headmaster
सावली तालुक्यातील पाथरी केंद्रांतर्गत येत असलेल्या उसरपार तुकुम येथे इयत्ता १ ते ४ वर्ग आहेत. दोन शिक्षक शाळा असून येथील मुख्यध्यापक दिलीप ढोक हे नेहमी दारू पिऊन येत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. दारू पिऊन असल्याने नीट उभे राहता येत नाही, शिकवणी करू शकत नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता पालकांना असल्यामुळे याबाबत पालकांनी तक्रार केली होती. Chandrapur zp school
सभापती विजय कोरेवार यांनी अचानक शाळेत भेट दिली असता मुख्यध्यापक दारू पिऊन आढळले. याची सभापती यांनी दखल घेत सदर शिक्षकास गाडीत बसवून पाथरी पोलीस स्टेशनला नेले व दारू पिऊन कर्तव्यात असल्याची तक्रार खुद्द सभापती विजय कोरेवार यांनी दिली. सदर शिक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास पाथरीचे पोलीस निरीक्षक शेवाळे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.
