बल्लारपूर :- ( रमेश निषाद) कमला नेहरू महाविद्यालयातील राणी वी. मानकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने Nagpur University नुकतीच आचार्य पदवी Acharya degree प्रदान केली ' इन्व्हेस्टीगेटींग द इफेक्ट ऑफ नॅनोपाटी॑कल्स ऑन स्टायरीन बुत्याडाइन रबर ॲन्ड इनहान्समेंट ऑफ रबर प्रोपटी॑ज ' हा त्यांचा शोध प्रबंधाचा विषय होता. कमला नेहरू महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. वासुदेव गुरनुले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. राणी मानकर यांचे ऐकून ११ शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. वासुदेव गुरनुले, पती देवानंद ताराचंद भरणे, वडील वशिष्टमुनी मानकर, आई शुक्रा मानकर, सासु शांताबाई भरणे आणि भाचा अनमोल चवरे व मानकर आणि भरणे परिवारातील सदस्यांना दिले आहेत.
