चंद्रपूर - बाबुपेठ मध्ये सतत वाढत चाललेली गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार तसेच शांतीसुव्यवस्था राखण्याकरिता आम आदमी पार्टी सातत्याने बाबुपेठ प्रभागात पोलीस चौकी सुरू करण्यात यावी याकरिता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे आपचे सचिव राजु कुडे यानी सतत पाठपुरावा केला, याकरीता पडीत निर्जन अवस्थेत असलेली पोलीस चौकी मध्ये विकृत व्यसनी लोकांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच वाढलेल्या झाडाझुडपाची स्वच्छ्ता करून स्वच्छ्ता अभियान राबविले. आणि पोलीस प्रशासनाचे तसेच जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. Aam Aadmi Party chandrapur
याचीच तात्काळ दखल घेत मनपा प्रशासनाने नेताजी चौक येथे जागा उपलब्ध करून दिली आणि पोलीस प्रशासना कडून दिनांक 07/10/2021 ला नेताजी चौक येथे नविन पोलीस चौकीचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. Police outpost in babupeth
यावेळी आप चे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, महानगर सचिव राजु कुडे,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराजजी सोनी, बाबुपेठ प्रभाग महिला संयोजिका श्रीमती सुजाता ताई बोदेले, पिंकी ताई कुकडे, सहयोजक जयंत थूल, सहण्योजक निखिल बारसागडे, चंदु भाऊ माडूरवार, जयदेव देवगडे, प्रवीण चूनारकर, सय्यद अश्रफ, शंकर भाऊ नीखाडे, राजवर्धन बोदेले, निखिल भाऊ, बाबाराव जी खडसे, सुखदेव दारूंडे, अंकूश राजूरकर, हितेश धकडे, श्रीकांत क-हाडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
