News 34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - पाच वर्षापुर्वी मंजुर झालेल्या बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत पूरक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासह दस्तऐवजांची चौकशी करून संबंधिता विरूध्द कारवाई करावी. या मागणीसाठी ग्रामस्थांनी येथील पंचायत समिती समोर दि.१८/१०/२०२१ पासून साखळी उपोषण सुरु केले होते. २०१४-१५ मध्ये बेंबाळ वासीयांसाठी १ कोटी ५लाख ३२ हजार ५६० रूपये खर्चाची पुरक नळ पाणी पुरवठा योजना मंजुर केली. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिनस्त सदर काम करण्यासाठी सर्व सोपस्कार पुर्ण करून चंद्रपुरातील दिपक गोणेवार नामक कंञाटदारास २५ जुन २०१५ रोजी काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सदर योजनेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पुर्ण झाले. परंतु अजूनपर्यंत बेंबाळ वासीयांना योजनेचे पाणी मिळालेले नाही. यासंबंधी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येवुन भ्रष्टाचार करणाऱ्या विरूध्द कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४९ अन्वये ग्राम पंचायत अंतर्गत उपसमिती गठीत करण्यात येऊन उपसमितीचे अध्यक्ष समितीचे सभापती चंदू मारगोनवार, यांच्या मार्फतीने करण्यात यावे असे ठरले होते. सदर काम १८ महीण्यात पुर्ण करून घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता सतिश गोर्लावार आणि चंदु मारगोनवार यांची होती. परंतु उपसमितीचे अध्यक्ष आणि शाखा अभियंता यांच्या निष्काळजीपणामूळे सदर योजना अजूनही रखडलेली आहे. ही बाब गंभीर असुन शासकिय निधीचा गैरव्यवहार करण्यात झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे करिता सदर योजनेच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा. योजनेची दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यात यावा आणि पाणी पुरवठा उपसमितीच्या संपुर्ण दस्तऐवजांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करावी. असे निवेदन जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना १५/१०/३०२१ ला देण्यात आले. याची गंभीर दखल घेऊन खासदार धानोरकर यांनी १६/१०/२१ ला जी. प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन त्वरित चौकशी करावी असे पत्रातून कळविल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर योजनेच्या कामाची सखोल चौकशी करण्यासाठी आपल्या नेतृत्वात तीन अधिकसऱ्यांची चौकशी समिती नेमली. यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम सिंदे, आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता हर्ष बोहरे यांची समिती नेमून योजनेच्या कामाची सखोल चौकशी पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार करणार्यांवर एफ.आय.आर.दर्ज करुन ४ दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश दिले.
याबाबत CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चौकशी अहवालाचे पत्र आणले.
रात्री ८-३० वाजता उपोषण कर्त्यांना भेट दिली. यावेळी प.स.गटविकास अधिकारी डॉ.मयूर कळसे, यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषणगाने लेखी लिहून दिले.व पत्र समजावून सांगितले. यावर उपोषण कर्त्यांचे समाधान झाल्याने संतोषसिंह रावत,बी.डी.ओ. डाँ.कळसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, विस्तार अधिकारी जीवन प्रधान यांनी उपोषण कर्त्यांना निंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता केली.
यावेळी दिपक पा.वाढई, संचालक,राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे, सुरेश फुलझेले, हसन वाढई, संदीप मोहबे, अतुल गोवर्धन, गौरव पुपरेड्डीवर, राहुल मुरकुटे हसन वाढई, सुनील शेरकी, कैलास चलाख, कडस्कर, पवन निलमवार, विकास वाळके,चांगदेव केमेकर, सुहास वाढई, विजय बोम्मावार, वासुदेव तिमांडे, लवसन वाढई, सुरेश झाडे, पराग वाढई आणि साईनाथ मेश्राम असें १६ उपोषण कर्ते उपस्थित होते.
