प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - 20 ऑक्टोम्बरला GRP बल्लारपूर/वर्धा रेल्वे पोलिसांनी बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर ACAP एक्सप्रेस रेल्वे मध्ये तब्बल 130 किलो 465 ग्राम गांजा पकडला.
सदर कारवाई वर्धा रेल्वे पोलीस स्टेशनमधील सपोनि सरवदे यांनी केली.
गांजा हा बेवारस स्थितीमध्ये असल्याने या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली नसून सदरचा गांजा हा आंध्रप्रदेश कडून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. cannabis
130 किलो गांज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी प्रकरणी सध्यातरी विदर्भातील ही मोठी कारवाई असल्याचे समजते.
