प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाच्या माध्यमातून ईपीक आप विकसित करुन त्या ऐपद्वारे शेतकऱ्यांनी स्वतः शेताच्या बांधल्यावर जाऊन आप-आपल्या पिकाची नोंदणी registration करण्याचे जाहीर केले असून ३० सप्टेंबर ही शेवटची मुदत दिली आहे. मात्र ई-पीक नोंदणी करतांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांजवळ अर्ध्या एकरपासून तर चार-पाच एकर एवढी शेती असून अनेक शेतकऱ्यांकडे साधा मोबाइल सुद्धा नाही. असे असतांना पीक पेरा ची नोंद करण्यासाठी एण्डराइड whatsapp स्मार्टफोन मोबाइल अत्यावश्यक आहे. परंतु अँड्रॉइड मोबाइल android घेण्यासाठी लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पाच ते दहा हजार रुपये कोठून आणणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मुल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती ही जंगल व्याप्त भागाला लागून असल्यामुळे अशा ठिकाणी मोबाईल वर नेटवर्क कधीच राहत नाही ही फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच अपवाद म्हणून एखाद्या शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल असेलही परंतु तो शेतकरी एवढा सुशिक्षित नाही की,त्याला त्याचा वापर पीक पेराची नोंद करता येईल.म्हणून तालुक्यातील असंख शेतकरी ईपीक e-pic पेरा नोंद करण्यापासून वंचित आहेत. करिता शासनाने दिलेल्या मुदतीत पीक पेराची नोंद करणे शक्य नाही. यासाठी तालुक्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा तलाठी, ग्रामसेवक यांच्याच मार्फतीने शेतकऱ्यांच्या ईपीक पेऱ्याची नोंद करवून घ्यावी .व दिलेली मुदत वाढवून द्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री नाम.उद्धव ठाकरे यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. स्मार्टफोन smartphone सारखे मोबाइल mobile तालुक्यातील 85 टक्के शेतकऱ्यांकडे आजही नाही. शेतकऱ्यांना मोबाइलचे तांत्रिक ज्ञानही अवगत नाही त्यामुळे 80 टक्के शेतकरी अजूनही ई-पीक पेरा नोंदणी करण्यापासून वंचीत आहेत. यासाठी शासन स्तरावरूनच नोंदणी करण्याचे आदेश निर्गमित करावे अशी विनंतीसह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी सभापती घनश्याम येनुरकर यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति राज्याचे महसूलमंत्री नाम.बाळासाहेब थोरात,जिल्ह्याचे पालक मंत्री,नाम.विजुभाऊ वडेट्टीवार,जिल्हाधिकारी, व उपविभागीय अधिकारी यांनाही देऊन विनंती केली आहे.
