प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील चिरोली-खालवसपेठ-नलेश्वर रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण उखडले असून रस्त्यावर चार-पाच फूट लांबीचे खड्डे पडले असून खड्यात पाणी साचले असल्याने नलेश्वर, मणिपूर, उथळपेठ ,खालवसपेठ येथील नागरिकांना व चिरोली येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल, दुचाकी वाहन व पायी जाणाऱ्या येणाऱ्या असंख नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरुन रेतीघाट असल्याने सकाळ पासून तर रात्री रेती वाहतूक करणारे मोठे असंख्य हायवे ट्रक सारखे रेतीची वाहतूक करीत असल्यामुळे हा रस्ता खराब झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळेला रेतीची हायवेने अवैद्य वाहतूक करणाऱ्या हायवे ट्रकवर त्वरित आळा घालावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. खालवसपेठ पासून पूर्वेस तीन किलोमीटर अंतरावर नलेश्वर गायमुख हे पर्यटन स्थळ असून याच पर्यटन स्थळाकडे Pits on the road जाणारा रस्ता पूर्णतः उखडून गेला आहे. त्यामुळे पर्यटकांना सुद्धा खड्यातून जाणे भाग पडले आहे. एकीकडे पावसाचे थैमान तर दुसरीकडे रेती वाहतूक करणाऱ्या हायवेची अवैद्य वाहतूक यामुळेच या रस्त्याची अवदशा झाली आहे. उथळपेठ हे गाव माजी पालकमंत्री यांचे दत्तक ग्राम असल्याने दत्तक ग्रामकडे जाणाऱ्या रस्त्याची अशी अवस्था होणे ही खेदाची बाब असल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखविले आहे. करिता रेतीची अवैद्य वाहतूक करणाऱ्या हायवे ट्रकवर मान. तहसीलदार साहेबांनी प्रतिबंध घालावा तसेच नलेश्वर उथळपेठ रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी उथळपेठ मणिपूर वाशीय ग्राम पंचायत युवा सदष्यांनि आणि अनेक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ केली आहे. अशीच अवस्था चिंचाला-फिस्कुटी रस्त्याची झाली असून याही मार्गावरून नेहमी जळ हायवे धावत असतात त्यामुळे रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडले आहेत हा रस्ता वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. करिता हा रस्ता देखील त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
