कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आणि गडचांदूर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली यात शेतकरी नेते वामनराव चटप, सागर गंपावार CA & SNGC , रितेश शाहू , अभय डोंगरे आणि आदी मान्यवर उपस्थित होते. विविध रस्तेविकास प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करिता SNGC संस्थेने एका कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना तज्ञांनी विकास कामे सुरु करताना राज्य अधिसूचना आवश्यक असल्याचे सांगितले. अधिसूचनेत जागेचे बाजार मूल्य व नुकसान भरपाई बाबत स्पष्ट सूचना असावी लागते.
याबाबतचे आक्षेप देखील सक्षम अधिकार्याकडे नोंदविता येतात. कलम 3C लागू झाल्यानंतर जागेची संयुक्त मोजणी सर्व संबंधित पक्षाच्या हजेरीत केली गेली पाहिजे. मोजणीच्या वेळी प्रत्यक्ष जमीन मालकाने उपस्थित राहणे गरजेचे आहे. 3D सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने मोबदला मिळत नाही. त्यासाठी मोठी प्रक्रिया राबवावी लागते याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांना मोबदल्यावर आक्षेप असल्यास त्याच्या निवारणासाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व बाबीचा विचार करून विकास प्रक्रियेतील अधिग्रहणाला समोर जावे असे आवाहन उपस्थित वक्त्यांनी केले. News34Korpana