संगीता कार्लेकर
तालुका प्रतिनिधी चंद्रपुर
चंद्रपूर - मागील एक वर्षांपासून चंद्रपूर येथील नवीन अत्याधुनिक बस स्थानकाचे chandrapur bus stand निर्माण कार्य रखडले होते. ते कार्य आता पूर्वपदावर आले असून निर्माण कार्याला पुन्हा सुरवात झाली आहे.या बांधकामाची पाहणी नुकतीच महानगर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात केली. बांधकाम पूर्ववत सुरू होणे हे, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या sudhir mungantiwar पाठपुराव्याने हे शक्य झाले असून भाजपाच्या ढोल बाजाओ आंदोलनाचे हे फलित आहे,अशी स्पष्टोक्ती महानगर भाजपाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना राज्यातील अनेक बस स्थानकांना अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात येऊन निधी मंजूर करण्यात आला.यात चंद्रपूर बस स्थानकासाठी 16 कोटी रु मंजूर करण्यात आले. परंतु,कंत्राटदारांचे धावते देयक शासनाने रोखून धारल्यावर तब्बल एक वर्ष काम स्थगित झाले. यात कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पण रखडली गेली. नागरिकांचा रोष वाढत गेला.विषयाचे गांभीर्य ओळखून महानगर भाजपाने 31 ऑगस्ट ला "ढोल बजाओ "आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारला जागे केले.तर आ मुनगंटीवार यांनी 1 सप्टेंबरला मुबंई येथे बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला खडसावले.त्याच्या परिपाक म्हणून कंत्राटदाराचे धावते देयक अदा करण्यात आले आणि पुन्हा काम सुरू झाले.त्याची पाहणी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांचे सोबत महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,महामंत्री रविंद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी,नगरसेवक संजय कंचर्लावार,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, महानगर उपाध्यक्ष अरुण तिखे,डॉ.भारती दुधानी यांनी केली.विभाग नियंत्रक निता सुतवणे , यंत्र अभियंता सेवाराम हेडाऊ, विभागीय नियंत्रक राहुल मोडक, आगार व्यवस्थापक सचिन डफले, मंगेश राऊत इत्यादी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले समाधान
यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी राहुल मोडक यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली.ते म्हणाले,धावते देयक मिळाल्याने पुन्हा कामे सुरू झाली.यात कॅटवाक,टाईल्स,फिनिशिंग व क्वार्टरचे पेंटिंग यांचा समावेश आहे.70 % काम आता पूर्ण झाले असून डिसेंबर 2021 पर्यंत बस स्थानक नागरिकांच्या सेवेत रुजू होईल.यावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.