प्रतिनिधी/सै. मुमताज अली
गडचांदूर:- कोरपना तालुक्यात सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूर येथील गांधी चौक येथे अष्टविनायक गणेश मंडळ व तहसिल कार्यालय कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन व दुरूस्ती मतदान नोंदणी शिबीर voter registration camp आयोजित करण्यात आले.याला युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून उपस्थित मान्यवरांनी यावेळी मतदाना विषयी जनजागृती केली.नवीन मतदान फॉर्म भरण्यासाठी युवकांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. अष्टविनायक गणेश मंडळाचे Ashtavinayak Ganesh Mandal पदाधिकारी वैभव गोरे,सदु गिरी, दिनेश डांगी,मेघराज एकरे, पंकज इटनकर, सूरज पींगे,तलाठी सोहेल अंसारी, कोतवाल अनील एरमुले,प्रा.दिनकर झाडे,प्रा. लिलाधर काळे,प्रा.सागर गुडेल्लीवार,प्रा. नुतेश डाखरे,प्रा.मालेकर व इतरांची सदर शिबीरात प्रामुख्याने उपस्थीती होती.