चंद्रपूर - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ऑनलाइन अवैध लॉटरी चालक पोलिसांना खुले आवाहन देत असून मागील अनेक वर्षांपासून ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली सट्टा व जुगार खुलेआम सुरू आहे, मात्र पोलीस प्रशासन या मोठ्या अवैध धंद्याकडे डोळेझाक का करीत आहे हा सध्या मोठा प्रश्न आहे. Online Lottery
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, गडचांदूर, घुघुस, ब्रह्मपुरी, दुर्गापूर, पोम्भूर्णा या ठिकाणी या ऑनलाइन लॉटरीचे जाळे पसरले आहे.
चंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख संदीप गिर्हे यांनी ऑनलाइन लॉटरी बंद करावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना निवेदन दिले आहे.
पोलिसांनी यावर गंभीर दखल घेत कारवाई केल्यास ऑनलाइन लॉटरीचे मोठे घबाड उघडकीस येऊ शकते, प्रशासनाने निवेदनावर दखल न घेतल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने सर्व ऑनलाइन लॉटरीचे दुकाने बंद करणार असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी प्रशासनाला दिला आहे.