कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते.गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय येथे(५ सप्टेंबर) शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या सभागृहामध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा तसेच संस्थेचे संस्थापक सचिव स्व. हरीभाऊ डोहे यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा.दिनकर झाडे, बावनकर सर,श्रीमती शेंडे मॅडम यांनी वर्ग ५ वी ते वर्ग १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.यात शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे,प्रा.वांढरे,प्रा.सैय्यद ज़हीर,ज्येष्ठ शिक्षक महेन्द्रकुमार ताकसांडे सर, प्रा.कु.ताकसांडे, कु.ज्योती चटप इत्यादींची उपस्थिती होती.यावेळी अध्यक्ष तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा. महेंद्रकुमार ताकसांडे,संचालन प्रा.दिनकर झाडे तर आभार प्रा.नितीन सुरपाम यांनी व्यक्त केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृन्द,प्राध्यापक वृन्द तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शासन नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.