चंद्रपूर - बाबुपेठ, लालपेठ मधील वाढती गुन्हेगारी आणी दारूबंदी हटविल्यानंतर होत असलेल्या घटना यासबंधी या भागातील जागृत नागरीक तसेच महिलानी आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांच्या कडे तक्रार केली.
या तक्रारीची दखल घेतली असता असे लक्षात आले की जवळच असलेल्या दोन रेल्वे स्टेशन मुळे गुन्हेगार गुन्हा करूण पळ काढत असतो व शहर पोलीस स्टेशन लांब असल्यामुळे पोलीसांचा वचक राहात नाही. त्यामुळे वारंवार चोरी मारामारी महिलांची छेडखानी च्या घटनेत वाढ होत आहे ,त्यामुळे परीसरातील नागरीकाची मागणी आहे की बाबुपेठ, लालपेठ या प्रभागातील पोलीस चौकी मागील कित्येक वर्षा पासून बंद आणि पडक्या अवस्थेत असल्याने तिथे कचरा आणि काही समाज कंटक द्वारे दारू बाटल्या टाकून घाण केली आहे. Babu peth Police Chauki
ती पोलीस चौकी सुरू झाली पाहीजे ,
या मागणीची दखल घेऊन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मान. श्री. आंबोरे साहेब यांच्या सोबत आपच्या बाबुपेठ शिष्टमंडळाने चर्चा केली चर्चेला तात्काळ प्रतिसाद देत सहकार्य करन्याचे ठरविले .
त्यामुळे आज दि.5/9/21 रोजी आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शहर पोलीस स्टेशन ची एक टीम यांच्या सहकार्याने पोलीस चौकी आवारात स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले व लवकरात लवकर मा.पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन पोलिस चौकी सुरू करण्याकरीता प्रयत्न केले जाणार आहे .आजच्या या अभियानात
आप चे जिल्हा अध्यक्ष श्री सुनिल देवराव मुसळे, शहर सचिव राजु शंकरराव कुडे, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवर, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, प्रभाग संयोजक सुखदेव दारुंडे, संस्थापक सदस्य श्री अश्रफ सय्यद, श्री चंदु भाऊ मदुरवार, श्री प्रवीण भाऊ चूनारकर, शंकर भाऊ कायारकर, महेश सिंह पाजी, महेश गुप्ता, बाबाराव खडसे, सुशांत धकाते, जयदेव देवगडे, बाबुपेठ प्रभाग महिला संयोजिका श्रीमती सुजाता बोदेले आणि पोलीस निरीक्षक आम्बोरे यांची टीम उपस्थित होती..