प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा : गोवरी-पोवनी एक्सपान्शन खुली खदानीअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून सेक्शन - 4 लावण्यात येईल, जमिनी लवकरच घेऊ अशी आशा दाखवून वेकोलीने नाल्या काढल्या त्या नाल्याचे पाणी शेतात जात असल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल.
Chakka jam
गोवरी-1 आणि पोवनी या दोन्ही खदानी जुडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात ब्लास्टिंग मुळे धोका निर्माण होत आहे.त्या संबंधी त्वरित उपाययोजना करण्यात येईल.पोवणी खदाणीच्या डम्पिंग यार्डमुळे परिसरातील शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. तो मार्ग मोकळा करून देण्यात येईल.
Wcl rajura
आणि गोवरी-पोवणी रस्ता दुरुस्ती करून खड्डे भुजवण्यात येईल अश्याप्रकारचे लेखी आश्वासन वेकोलीने दोन महिन्यापूर्वी दिले होते.परंतु यातील एकही आश्वासन पूर्ण न करता परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांना फसवण्यात आले.या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज गोवरी गावाजवळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
Shivsena
मागण्या 7 दिवसात पूर्ण करा अन्यथा तुमचे काम बंद करू असा इशारा शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी वेकोली प्रशासनाला दिला.
याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना तालुका प्रमुख घुगुस हेमराज बावणे, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना गोवारीच्या सरपंच सौ आशाताई उरकुडे, गणेश चोथले सुनील गौरकर, प्रदीप वाढरे, निखील मानुसमारे, अमोल देवाडकर, राजू देवाडकर, संदीप सिडाम, रुपेश चौधरी बाळा सातघरे, राकेश चौधरी,सोनल मोहुर्ले, सुनिल पाचाभाई आणि कार्यकर्ते उपस्थित होते.