राजुरा - युवासेना प्रमुख , पर्यावरण environment,राज्यशिष्टचार व पर्यटन मंत्री मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या पर्यावरण हा आवळता विषय म्हणून त्यांनी सुरू केलेली माझी वसुंधरा या संकल्पनेने प्रेरित होऊन युवासेना राजुरा तालुका च्या वतीने पर्यावरपूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा घेण्यात आली.
युवासेना सचिव मा. वरूनजी सरदेसाई साहेब, युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम, युवासेना विस्तारक नित्यानंद त्रिपाठी साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे,शिवसेना तालुकाप्रमुख व नगरसेवक राजूभाऊ डोहे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रणितभाऊ अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुका राजुरा च्या वतीने पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. यात राजुरा शहरातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, ही स्पर्धा Covid चे नियम ध्यानात ठेवून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण दि. १८-०९-२०२१ रोजी करण्यात आले.
Shivsena
पहिल्या क्रमांकाचे बक्षीस कु. सानवी मोरे, राजुरा यांना रोख रक्कम ३००१, सन्मानचिन्ह व गौरवार्थ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच द्वितीय बक्षीस अजित सातपुते , राजूरा, २००१ , प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह ,तृतीय बक्षीस सौरव वाटेकर , राजुरा १००१, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह यांना देण्यात आले. तसेच डॉ.आचल हरणे, गणेश शेंडे, मंगेश मस्के, अनुश्री कुलसंगे, अनिकेत रणदिवे, निखिल सुर्तेकर, जानकी हनुमंते, राहुल शेंडे, श्रेयश बुराण, संदीप भताने, आकाश चौधरी,वेदांत पाचभाई, प्रशांत ठुसे, अक्षय श्रीकोंडावार, सोनी लिंगमवार, सुरज हरिहर, चेतन भटारकर, चंद्रशेखर शिवणकर, अक्षय निब्रड, शुभम ईटणकर, साई ढेंगरे, अजय वाढई, किट्टू मेडपल्लीवार, धिरज भोयर, आशुतोष ठोंबरे, देवकिशन वनकर, रामचंद्र शेंडे, शुभम श्रीकोंडावार, मयुर मुराटे, सुरज खनके व सर्व स्पर्धकांना गौरवार्थ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. Yuvasena rajura
यावेळी युवासेनेचे तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर, तालुका चिटणीस (संघटक) कुणालभाऊ कुडे, तालुका चिटणीस वतन मादर, उपतालुकाप्रमुख प्रविणभाऊ पेटकर, युवासेना शहर प्रमुख पंकजभाऊ बुटले, युवासेना शहर चिटणीस स्वप्नील मोहुर्ले, युवासैनिक श्रिनाथ बोलूवार, अंकुश बुटले, गणेश चौथले, मयूर बोबडे उपस्थित होते.