प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - गणेशोत्सवाच्या ganesh festival पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आज बल्लारपूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील जुना बस स्टॅण्ड, बुद्ध नगर, संतोषी माता वार्ड, गोरशिया मस्जिद, राजेंद्र वार्ड, बालाजी, नवीन बस स्टॉप, गणपती वार्ड, गोल पुलिया, आंबेडकर चौक, जामा मस्जिद, गांधी चौक, सात नल चौक परिसरात रूट मार्च route march करण्यात आला.
या रूट मार्च मध्ये सपोनि रमीज मुलानी, शैलेंद्र ठाकरे, विकास गायकवाड, प्रमोद रासेकर, पोउपनी चांदुरे, टेम्भुरने व 44 पोलीस अंमलदार, 33 होमगार्ड homegurd यांचा समावेश होता.
