प्रतिनिधी/सै. मुमताज अली
गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील पुर्वी माणिकगड Manikgad व सध्याची अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech cement company) कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण Air Pollution होत असून कंपनी प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जात आहे.सदर कंपनीचे वायूप्रदूषण गडचांदूर व परिसरातील नागरिकांच्या अक्षरशः जिव्हारी लागले असून सरासरी आयुर्मानात घट होत असल्याचे चित्र आहे.तसेच या प्रदूषणामुळे pollution येथील नागरिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे.या गंभीर विषयी विविधस्तरातून बरीच आंदोलने झाली.मात्र समाधानकारक काहीच घडले नाही.याबाबींची कोणीही दखल घेताना दिसत नसून १६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कंपनीतून फार मोठ्याप्रमाणात धूर बाहेर सोडण्यात येत असल्याचा फोटो तक्रारीसह महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे Minister of Environment यांना आशिष देरकर यांनी ई-मेलद्वारे पाठवला असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर कंपनी व्यवस्थापन व चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर बाबीला जबाबदार असून ते मुद्दाम याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करत यामध्ये प्रदुषण नियंत्रण मंडळ Pollution Control Board अधिकाऱ्यांचे काय स्वार्थ दडले आहे ते ठाऊक नसल्याचे मत देरकर यांनी तक्रारीत व्यक्त केले आहे.सदर सिमेंट कंपनीचे वायुप्रदूषण मानवी जीवास धोकादायक ठरत असतानाच पर्यावरण नियमांचे उल्लंघन सुद्धा होत आहे. याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी विनंती वजा मागणी देरकर यांनी पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे.थेट पर्यावरण मंत्र्यांनाच फोटो पाठवल्याने आता याविषयी काय घडते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
