प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - "आदिवासींचा समूह या देशातील मूळनिवासी आहे त्यांना वनवासी म्हणून हिणवणे त्यांचे 'वनवासी'करण Deforestation करणे, म्हणजे त्यांच्या अस्मितेला डिवचणे होय. आदिवासींना आदिवासी/ मूळनिवासी Indigenous म्हटल्याने आपण या देशातील "उपरे किंवा परके" ठरु, अशी भीती येथील प्रस्थापितांना वाटत असल्यामुळे हे कुटील डावपेच आखले जात आहे. त्यामुळे आदिवासींनी संघटित होऊन आपल्या अस्मिता संवर्धनासाठी संघर्ष केला पाहिजे." असे महत्वपूर्ण विचार प्रबोधनकार, सुप्रसिद्ध वक्ते Well known speakers , विचारवंत मा.दिलीप सोळंकी यांनी 'अफ्रोट' तालुका शाखा बल्लारपूर द्वारा आयोजित आदिवासी समाज प्रबोधन सभेला मार्गदर्शन करतांना मांडले.
यापुढे ते म्हणाले की,'आदिवासींनी Tribal आपल्या विज्ञाननिष्ठ, मूळ, उज्वल रुढी परंपरेचे जतन करावे आणि आपल्या घरादारातून हिंदू धर्मियांच्या प्रतिमा, प्रतीके काढून टाकावे तरच त्यांचे अस्तित्व या देशात कायम राहील अन्यथा काळाच्या वेगवान धारेत ते नेस्तनाबूत होतील".
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. हरीश गेडाम सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, उदघाटक विजय कुमरे जिल्हाध्यक्ष अफ्रोट शाखा चंद्रपुर,
शंकर मडावी सरचिटणीस अफ्रोट जिल्हा शाखा चंद्रपूर, दिनेश कोवे कोषाध्यक्ष अफ्रोट जिल्हा शाखा चंद्रपूर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर उपस्थित होते.
यावेळी प्रल्हाद कोटनाके, नितेश उरवते, पुरुषोत्तम कन्नाके यांची समयोचित भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त पुरुषोत्तम कन्नाके, आणि प्रबोधनकार दिलीप सोळंकी सर यांचा मान्यवरांकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कोवे अध्यक्ष अफ्रोट तालुका शाखा बल्लारपूर तर सुत्रसंचालन सुधाकर कुळसंगे आणि आभार प्रदर्शन प्रवीण कन्नाके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल कुमरे, अनिल कुडमेथे, प्रकाश मेश्राम, योगेश कोडापे,सौ.विजया कुमरे, सौ.शालिनी कोवे, सौ.प्रिती कन्नाके, सौ.सीमा कोटनाके, सौ.गौरी उरवते, यांनी सहकार्य केले.