प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा - राजुरा शहरामध्ये गडचांदूर मार्गावरील नाका नंबर ३ हे अत्यंत वर्दळीच ठिकाण आहे व या ठिकाणी देशी दारूची भट्टी व बार असल्यामुळे या परिसरात काही लोक मद्यप्राशन करून नशेमध्ये दररोजच भांडणे करीत असल्याचे प्रकार सुरूच असल्याने तेथून लहान मुले महिला व वृद्धांचे त्या भागातून त्या परिसरात जाणे येणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला व नागरिकांना असुरक्षितता वाटत असल्याच्या तक्रारी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना प्राप्त होताच त्यांनी तात्काळ नाका नंबर ३ परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये व नागरिकांना असुरक्षितता वाटू नये याकरिता त्या ठिकाणी स्थायी स्वरूप पोलिस चौकीची मागणी केली. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री. शिवाजी महाराज chatrapati shivaji maharaj यांच्या छायाचित्रांची मोठी प्रतिमा आहे व या छायाचित्राच्या चबुतऱ्यावरतीच बसून मद्य प्रेमी मद्यप्राशन करून महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावण्याचे कृत्य या ठिकाणी करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेली ही जागा चबुतऱ्याभोवताल सौंदर्यीकरण/ सुशोभीकरण करण्याकरिता आरक्षित reserve असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ह्या चबुतर्यावरती देशी दारू च्या बॉटल्स व चकण्याकरिति घेतलेल्या खाद्यपदार्थांचा कचरा टाकून मद्यप्रेमी निषेधार्थ कृत्य करीत असल्याचा प्रकार या ठिकाणी होत आहे. या आधी या परिसरात राजू यादव नामक युवकाची gun fire बंदुकीने गोळी मारून हत्त्या केल्याचा प्रकार घडला होता व दिनांक:- २६/०९/२०२१ रोजी सायंकाळी याच परिसरात एका तरुणाने व्यवसायिक वादातून माजी नगरसेवक तूमाने यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली पण सुदैवाने ते यातून बचावले परंतु गंभीर जखमी झाले आहेत. भविष्यात अशी कुठली घटना त्या परिसरात परत होऊ नये व मद्य प्राशन करून नशेत धुंद असनाऱ्या लोकांनी निष्पाप व्यक्तीचा जीव घेऊन गुन्हेगारी करीत शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून कायदा सुव्यवस्था law & order बिघडवू नये या दृष्टिकोनातून युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी या वर्दळीच्या ठिकाणी स्थायी स्वरूपी जनते करिता पोलीस प्रशासनाला नाका नंबर ३ येथे पोलीस चौकी ची मागणी केली आहे. राजुरा ते रामपूर या भागातील परिसरामध्ये एकही पोलीस चौकी नसल्यामुळे रात्रीच्या सुमारास एखादी दुर्घटना घडल्यास महिलांना व त्या परिसरातील yuva swabhiman नागरिकांना तक्रार करण्याकरिता नाका नंबर ३ या परिसरातील पोलीस चौकी ही सोयीस्कर होईल. याकरिता जिल्हाध्यक्ष यांनी या गंभीर विषयाचे महत्त्व निवेदनाद्वारे व संबंधित विभागांमध्ये तेथील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चेच्या माध्यमातून तात्काळ या परिसरामध्ये लोकांच्या सुरक्षितते करिता व गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता या ठिकाणी २४ तास स्थायी स्वरूपी पोलीस चौकी द्यावी अशी मागणी केलेली आहे. यावेळेस युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे व यांच्यासह आल्विन सावरकर, ऑस्टिन सावरकर, निखिल बजाईत, राहुल चव्हाण, मोहब्बत खान, अजवान टाक, शोएब शेख, भूपेश साटोणे, महेश ठाकरे, सोनू शेख आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.