चंद्रपुर:- निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्याचे वृद्धत्व चुकवीता येत नाही मात्र वृद्धत्वाकडे सकारात्मकतेने अंगीकारल्यास वृद्धत्व सुसह्य होते असे मौलिक मार्गदर्शन प्राचार्य स्मिता ठाकरे यांनी विकलांग सेवा संस्थेच्या वतीने वृद्ध स्नेहभोजन उपक्रमात केले.
स्वातंत्र्याचे ७५ वर्षपूर्ती औचित्य साधून चंद्रपुरातील निवडक वृद्ध बांधवाना याप्रसंगी वस्त्रालंकार, गुलाबपुष्प देऊन वृद्धानी आजवर दिलेल्या योगदानाबद्दल तसेच अनुभवाचा व ज्ञानाचा समाजशील कार्याबद्दल भावपूर्ण गौरव करण्यात आला.
व्यासपीठावर रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत रेशिंमवाले, मातोश्री वृद्ध आश्रम सचिव व भावी अध्यक्ष रोटरीचे श्री जयस्वाल,कथ्थक नृत्य पारंगत गुरू मृणालिनी प्रवीण ,संजीवीनी कुबेर यांनी स्थान भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगगुरू श्री दडगाल यांनी तर आभारप्रदर्शन प्रसाद पान्हेरकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शर्वरी कुबेर ,देवराव कोंडेकर, भोलराम सोनूले ,अशोक खाडे ,पूजा चहारे खुशाल ठलाल इत्यादींनी सहकार्य केले.