गडचांदूर:- गडचांदूर येथील हरी शेंडे वयवर्ष ५५ यांना नुकतेच लकवा(अर्धांगवायू) Paralyzed रोगाने ग्रासले. पत्नी,दोन मुलीची जबाबदारी व मोडकळीस आलेले घर त्यावर आर्थिक परिस्थिती हलाखीची. यामुळे वैद्यकीय तपासणी, औषधोपचारासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली. "एक हात मदतीचा" One Hand Helping म्हणून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून लकवाग्रस्त शेंडे यांच्यासाठी निधी गोळा केली. प्रवीण गुंडावार,ॲड.दीपक चटप,संतोष पटकोटवार, नागोजी गोवारदीपे यांनी गोळा केलेली सदरची रक्कम शेंडे यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केली.विलास धांडे,प्रवीण गुंडावार, ॲड.दीपक चटप,डॉ.जयदिप चटप, संतोष पटकोटवार,डॉ.के.आर.भोयर, खाजा भाई, वासूदेव गौरकार,दिलीप आस्वले,प्रवीण एकरे, मनोहर सातपुते, गुणवंत खोके,नागोबाजी गोवारदिपे, शैलेश विरुटकर,महादेव नागभीडकर, ज्ञानेश्वर अवताडे आदींनी आर्थिक सहकार्य केले.