चंद्रपूर - राज्याचे बहुजन कल्याण मंत्री (ओबीसी) तथा चंद्रपूरचे पालकमंत्री guardian minister vadettiwar विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून तब्बल १९ वर्षांनंतर जिल्ह्यातील ओबीसी समाजाला १९% आरक्षण प्राप्त झालं. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस mahila congress आणि काँग्रेस कार्यकर्ते मतीन कुरेशी यांच्या वतीने पालकमंत्री वीजय वडेट्टीवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला त्याच सोबत पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी obc जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, काँग्रेस कार्यकर्ते मतीन कुरेशी, महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे, नगरसेविका सुनीता लोढिया, उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फाउंडेशन च्या शहर अध्यक्षा शीतल कातकर, सेवा दल महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे, संदीप सीडाम, काँग्रेस सेवा फाउंडेशन ग्रामीण चे अध्यक्ष सय्यद हाजी अली , ब्रिजेश तामगाडगे, सुनील चौहान, बबलू कुरेशी, ऐजाज शेख, मोबिन शेख यांची उपस्थिती होती.