चंद्रपूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुर्व विदर्भातील चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयासह राज्यातील एकुण आठ जिल्हयांमध्ये ओबीसी समाजाकरीता असलेले आरक्षण वाढविले आहे. चंद्रपुर जिल्हयात 11 टक्के तर गडचिरोली जिल्हयात ओबीसी समाजाला 6 टक्के आरक्षण मिळत होते. Obc reservation आठ जिल्हे वगळुन उर्वरीत जिल्हयात ओबीसी समाजाला 19 टक्के आरक्षण असताना या जिल्हयांत आरक्षण कमी असल्यामुळे ओबीसी समाजावर नोकर भरतीत अन्याय होत होता. या पार्श्वभुमीवर राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे या विषयावर अभ्यास करून ओबीसींना न्याय देण्यासाठी काॅंग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेसचे महाविकास आघाडी सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना केली होती. या अनुषंगाने राज्य सरकारने याबाबत महत्वाचा निर्णय घेऊन आरक्षणाची टक्केवारी वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहेे. आता चंद्रपुर जिल्हयात 11 वरून 19 तर गडचिरोली जिल्हयात 6 वरून 17 टकके आरक्षण वाढविण्यात आलेले आहे. याचा लाभ क आणि ड वर्ग पदांचे भरतीत ओबीसींना होणार आहे. यामुळे जिल्यातील ओबीसी समाजामध्ये उत्साह संचारला असुन ओबीसींना वाढीव आरक्षण मिळवुन देण्यासाठी आग्रही व मोलाची भुमिका बजावणारे ना. विजय वडेट्टीवार vijay vadettiwar यांचे सोमवारी चंद्रपुरात पहील्यांदा आगमन झाल्यावर काॅंग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे वतीने त्यांचे आभार मानन्यात आले. यावेळी काॅंग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सुर्या अडबाले, ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ताजणे, राजुरा तालुका अध्यक्ष उपसरपंच उमेष मिलमिले, राजुरा शहर अध्यक्ष संदीप आदे, कोरपना तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, कवडु सातपुते, चंद्रपुर तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, जिवती तालुका अध्यक्ष विष्णु मुसने, जिवती शहर अध्यक्ष दत्ता गिरी, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष प्रा रमेश हुलके, माथराचे माजी सरपंच लहु चहारे, धोपटाळाचे सरपंच राजु पिंपळशेंडे, दिपक वांढरे, अतुल दिवसे,महेश राजुरकर,सुधाकर बोंडे,आदित्य क्षिरसागर,दिनेश ताजने, अंकीत लोहकरे,भुषण मिलमिले, प्रकाश पेटकर,किरण कौरासे आदींची उपस्थिती होती.