घुग्घुस - रविवार 12 सप्टेंबर रोजी घुग्घुस प्रयास सखी मंचच्या (Ghughus Prayas Sakhi Manch) अध्यक्षा सौ. किरण बोढे यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन साकीनाका अत्याचार (mumbai sakinaka rape) प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील अंधेरीच्या साकीनाका परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अमानुष अत्याचार करण्यात आलेल्या 32 वर्षीय महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूसोबतची तिची झुंज अखेर अपयशी ठरली. दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना महाराष्ट्रात घडली आहे. एका मागून एक महिलांवरील बलात्काराच्या घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हदरून गेला आहे व समाज मन सुन्न झाले आहे या घटनेचा निषेध करीत नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. (Hang the accused)
निवेदन देतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरण बोढे, माजी जि.प. महिला व बालकल्याण सभापती सौ. नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. वैशाली धवस, पुष्पाताई रामटेके, सुनीता पाटील, सुनीता वर्मा, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, प्रिया नागभीडकर, भारती परते व पायल मांदाडे उपस्थित होत्या.