चंद्रपूर - Big Boss Fem पायल रोहतगी या अभिनेत्रीने गांधी परिवारावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या बाबत राज्यभरात कांग्रेस रोहतगी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी देत आहे. Payal Rohatgi
राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचेंबद्दल खालच्या पातळीवर टीका करून पायल रोहतगी या भाजप गॅंग मधील सदस्याने आपला दर्जा दाखविला आहे, याविरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेसतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांचेकडे तक्रार दिली आहे.
सदर व्हिडीओ हा देशभरात व्हायरल करण्यात आल्याने गांधी परिवाराची बदनामी करण्याचा कट भाजपच्या आयटी मधील ट्रोल गॅंग ने केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यात व विकासकामात गांधी परिवाराने आपलं बलिदान दिले आहे आणि त्यांच्या बलिदानाचा असा अपमान कांग्रेस सहन करणार नसल्याचे महिला कांग्रेस प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत कांग्रेस सेवादलच्या जिल्हाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, लता बारापत्रे, अनु दहेगावकर, शालिनी भगत आदींची उपस्थिती होती.