चंद्रपूर - 9 सप्टेंबरला चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसरात वनश्री आंबटकर या युवतीवर प्रफुल आत्राम याने भररस्त्यात चाकूने वार केले.
3 दिवस मृत्यूशी झुंज देत 12 सप्टेंबरला वनश्रीचा मृत्यू झाला. Babupeth
सदर घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला होता, या घटनेचा बाबूपेठ वासीयांनी निषेध व्यक्त करीत अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेत वनश्रीच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी केली.
विशेष म्हणजे 1 सप्टेंबरला आरोपी प्रफुल ने वनश्री ला मारण्याची धमकी दिली होती व याबाबत वनश्री ने पोलीस स्टेशन रामनगर मध्ये तक्रार सुद्धा दाखल केली मात्र महिलांच्या तक्रारीबाबत पोलिसांनी असंवेदनशीलपणा दाखवीत अदखलपात्र गुन्हा दाखल केला, आपल्याविरोधात पोलिसात तक्रार झाल्याचे प्रफुल ला माहीत झाल्यावर तो चांगलाच चवताळला व त्याने 9 सप्टेंबरला वनश्रीवर चाकूने knife stab वार करीत तिला कायमचे संपविले.
आरोपी प्रफुल आत्राम ला फाशी व्हावी hang the accused, वनश्री च्या तक्रारींवर गांभीर्य न दाखविणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करावे, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात Fast Track Court चालविण्यात यावे, बाबूपेठ येथील नेताजी चौकात पोलीस स्टेशन देण्यात यावे, व आंबटकर कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी बाबूपेठ परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.
निवेदन देताना बाबूपेठ परिसरातील चंदा वैरागडे, शैलेश जुमडे, प्रदीप किरमे, पियुष धुपे, महेश मैकलवार, शिल्पा आंबटकर यांची उपस्थिती होती.
