चंद्रपूर - 9 सप्टेंबरला चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या महाकाली मंदिर परिसरात एकतर्फी प्रेमात युवतीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता.
या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
बाबूपेठ महात्मा फुले चौकात राहणाऱ्या 35 वर्षीय आरोपी प्रफुल आत्राम हा वनश्री आंबटकर या मुलीला एकतर्फी प्रेम one side love करीत होता, मात्र मुलीने त्याला नकार देताच प्रफुल चवताळून गेला व तिच्यावर भर रस्त्यात चाकूने वार केले, 3 दिवसाच्या झुंजीनंतर वनश्री ची प्राणज्योत मालवली. Knife stab
ह्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध जिल्हावासीयांनी केला, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा करण्यात आली.
विशेष म्हणजे 1 सप्टेंबरला प्रफुल ने वनश्री ला जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यासंदर्भात वनश्री ने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार ही दिली मात्र पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य समजले नाही आणि ही घटना घडली, वनश्री ला नाहक जीव गमवावा लागला.
15 सप्टेंबरला जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी आंबटकर परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. Balu Dhanorkar
खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी आंबटकर परिवाराला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका घेत 1 सप्टेंबरला पोलिसांनी कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना सूचना केली आहे.
यावेळी खासदार धानोरकर यांनी परिवाराला आर्थिक मदत देत राज्य व केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत मिळवून देण्याचेही आश्वासन दिले.
पीडित आंबटकर कुटुंबासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही सुद्धा खासदार धानोरकरांनी यावेळी दिली.
आंबटकर कुटुंबीयांनी खासदार धानोरकर यांना निवेदन देत आरोपी प्रफुल आत्राम ला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.
यावेळी कांग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय, कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी, राजविर यादव व चंदा वैरागडे उपस्थित होते.
