प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या Cdcc Bank अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाती घेतले तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या गंभीर रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत अनेक कॅन्सरग्रस्त व दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना बँकेचा आधार देण्याचे काम बँक करीत आहे. मुल येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण शेतकरी मनोहर राजूरवार यांना कँसर झाल्याचे लक्षात येताच बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी रुग्णाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन आजाराच्या उपचाराबाबत चर्चा करुन त्यांना शेतकरी कल्याण निधीमधून चाळीस हजार (४००००/-) रुपयांचा धनादेश देत श्री. गणपतीच्या आशीर्वादाने तुम्ही लवकर बरे व्हाल अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावर ,माजी नगर सेवक गुरु गुरनुले, सुरेश फुलझेले,माजी न.प.उपाध्यक्ष चंद्रकांत चतारे, बँकेचे अधिकारी नंदूजी मडावी, संतोष वाढई, सतीश राजूरवार, श्री.पाल, यांचेसह वार्ड नंबर १४ मधील नागरिक व शेजारी बांधव उपस्थित होते. कॅन्सरग्रस्त cancer patients निराधार रुग्णाला CDCC बँकेचा आधार दिल्याबद्दल अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या सहकार्याबद्दल राजूरवार कुटुंबीयांनी व उपस्थित वार्ड वाशीय बंधूनी भाऊंचे आभार मानले.