News34Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - कल्याणकारी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक विकासाच्या योजना CDCC बँकेच्या माध्यमातून राबवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातील शेतकरी केवळ शेती उत्पन्नाच्या भरवशावर विसंबून न राहता शेतीला जोड धंदा म्हणून जो जमेल तो व्यवसाय करावा आणि आपला आर्थिक विकास साधावा असे आव्हान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी शेतकऱ्यांना केले.
मणिपूर(उथळपेठ) येथील गजानन बिना वेलादी या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दूध देणाऱ्या दोन म्हैस अचानक दगवल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे गजानन वेलादी आर्थिक संकट कोसळले याबाबतची माहिती CDCC बँकेचे chandrapur अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना प्राप्त होताच संकटग्रस्त शेतकऱ्याला बँकेचा आधार म्हणून मणिपूर (उथलपेठ) येथे शेतकऱ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रत्येकी दहा हजार रुपये असे एकूण २० हजार रुपयांचे चेक गजानन वेलादी कुटुंबियांना समस्त गावकऱ्यासमोर संतोषसिंह रावत यांनी दिले.
तसेच बँकेत सबसिडीवर bank subsidy आणि अल्प व्याजदरात सुरु असलेल्या सर्व योजनांची Loan माहिती समस्त गावकऱ्यांना दिले. महिला व पुरुष बचत गटांसाठी कमी व्याजदराने अनेक योजना आहेत तात्काळ २ लाख व ५ लाख कर्ज देण्यात येत आहे. आपण या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. व माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजना Former Prime Minister late. Rajiv Gandhi Swavalamban loan scheme उथळपेठ हेमलता भुजंग चीचघरे, जीवन पालिकोंडवार, लिलाधर चीचघरे या लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे समवेत संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, कृषी उत्पन्न बाजार Agricultural Produce Market Committee समिती संचालक हसन वाढई, चिरोली बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिल सिरस्कर, प्रशांत कंदलवार, बंडू देऊरमले, कैलास वाळके, ग्रा.प.सदस्य सुरेंद्र चीचघरे, श्रीकांत बुरांडे, भाऊराव गेडाम, नलेश्वर उपसरपंच किर्तीवर्धन शेंडे, सुरेश चीचघरे यांचेसह अनेक गावकरी महिला ,युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माजी नगर सेवक गुरु गुरनुले यांनी केले. उथळपेठ येथे युवकांची बैठक घेऊन गावातील व परिसरातील इतर समस्येवर रावत यांनी चर्चा केली.