गडचांदूर :- गडचांदूर शहरापासून काही अंतरावर माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या अंमलनाला धरणा Amalnala Dam जवळील वेस्टवेअरचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक दररोज याठिकाणी येतात. येथील निसर्गरम्य व मनमोहक वातावरण पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे ठरत आहे.काही पर्यटक येथील वातावरणाचा मनसोक्तपणे आनंद घेत आहे तर काहींना सदर स्थळ जीवघेणे ठरत आहे.गेल्या महिन्यात याठिकाणी चंद्रपूर येथील एका तरुणाने आपला जीव गमवल्याची घटना ताजी असतानाच १४ सप्टेंबर रोजी पुन्हा दोन युवकांचा येथील पाण्यात बुडून मृत्यू झाला.दरवर्षी याठिकाणी एक ना एक जीव जात असून यावर्षी मात्र तीन तरूणांनी जीव गमवला आहे.येथे येणार्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता याठिकाणी पोलीस नेमण्यात आले.तरीपण मृत्यूचे सत्र सुरूच आहे.
सावधान पर्यटकांनी सदर ठिकाणी जावू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा गडचांदूर पोलीस स्टेशनतर्फे फलक लावून देण्यात आला असून हे जे पाण्याचा क्षेत्र आहे तिथे खोल पाणी आहे,खोल डोह आहे.कृपया कुणीही या बाजूला पोहायला येऊ नये.पुर्वी येथे दुर्घटना घडली असून भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे.अमलनाला हे जे धरण आहे तिच्यापासून अर्धा एक किलोमीटर अंतरावर हा परिसर असून कोणीही येथे जावू नये असे आवाहन गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजीत आमले यांनी थेट सदर ठिकाणी जावुन नागरिकांना केले आहे.
