घुघुस - चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथे कोळसा खदान लागून असल्याने अनेक स्थानिक लोकांनी कोळसा वाहतूकिकरिता ट्रक खरेदी केले परंतु मोठमोठे ट्रान्सपोर्ट या व्यवसायात उतरल्याने स्थानिक एक दोन गाड्या असलेल्या मालकांना कोळशाचे वाहतूक करण्यासाठी कोणतेही काम मिळत नसल्याने बेरोजगारीची पाळी त्यांच्यावर आली आहे.
असाच प्रकार अनेक दिवसांपासून होत असल्याने स्थानिकांनी संतप्त होत, Mns Chandrapur महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रवीश सिंह व यंग चांदा ब्रिगेडचे Young Chanda Brigade अब्रार व हनीफ मोहम्मद यांनी घुग्घुस येथून जवळच असलेल्या नायगाव कोळसा खाणीच्या चेकपोस्ट जवळ येथील स्थानिक ट्रक चालक मालकांना घेऊन धरणे आंदोलन केले.
स्थानिक पल्ला गाडीच्या ट्रक चालक मालकांना रोड सेलच्या डिओ मध्ये काम देण्यात येत नाही आहे. वेकोली वणी क्षेत्राच्या नायगाव, मुंगोली, पैनगंगा या कोळसा खाणीतील रोड सेलच्या डीओ मध्ये मोठे ट्रान्सपोर्टर टिप्पर गाडी लावून कोळसा उचलत आहे. यात आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील ट्रक लावून कोळश्याची उचल मोठे ट्रान्सपोर्टर करत आहे. Stop coal transport
सप्रा, चड्डा, फुलको, भाटिया, गुप्ता अश्या मोठया ट्रान्सपोर्ट कंपण्यांना काम देण्यात आले आहे. या कंपण्या स्थानिक ट्रक चालक मालकांच्या गाड्या लावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावल्याचे आरोप रविष सिंह यांनी केला. यापुढे स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर भविष्यात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविष सिंह व यंग चांदा ब्रिगेडचे सय्यद अब्रार नकोडा माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांनी ट्रान्स्पोर्टर ला दिला आहे, भविष्यात कोळसा वाहतुकीचा मुद्दा तापणार असून स्थानिक उग्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
सदर आंदोलनात सानू सिद्दीकी, राहुल यदुवंशी, कलीम खान, सुनील चिलका, अनिल ठाकूर, सोनू ढेमरे, दिलीप पांडे, इब्राहिम खान, वसीम शेख, सलीम शेख, परवेज शेख, ताजू शेख, इमरान शेख, आशिष गुंडेटी, फिरोझ शेख राजू शेख उपस्थित होते.
