प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - दिनांक 9/9/2021 रोजी
बल्लारपुर शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील शिवाजी वार्ड व साईबाबा वार्डातील सिमेंट काॅंक्रीट रस्त्याचे व भुमिगत नालिच्या बांधकामाचे भुमिपुजन माजी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष मा.चंदनभैय्या चंदेल यांच्या हस्ते व नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या विकास कामाकरिता या प्रभागाचे नगरसेविका सौ.सुवर्णा अरुण भटारकर यांनी सतत पाठपुरावा करुन विकास कामा करिता निंधी उपलब्ध करवुन घेतला. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष श्री.काशी नाथ सिंह,महामंत्री श्री.मनिष पांडे,ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा संयोजक श्री.राजु दारी,भाजपा शहर उपाध्यक्ष श्री.मून्ना ठाकुर,भाजपा पदाधिकारी श्री.अरुण भटारकर व वार्डातील शराफत हुसैन, कमलाबाई बहुरीया,एस.के.राय,राजु राठोड,सुनिल भटारकर,श्रिधर हरडे,ऊमा भटारकर,कार्तीक रामटेके, आणी इतर नागरिक उपस्थित होते.