चंद्रपूर - अनंतचतुर्दशी 19 सप्टेंबरला श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करून पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत 10 दिवसीय गणेशोत्सवाचे समापन झाले.
यंदा शहरातील गणेश विसर्जन इराई नदी मध्ये करण्यात आले होते, यावेळी पोलीस व मनपा प्रशासनातील कर्मचारी विसर्जन स्थळी 24 तास आपली सेवा देत होते, विसर्जन आटोपल्यावर पोलीस व प्रशासनामधील कर्मचारी आपल्या कर्तव्यावर रुजू झाले.
मात्र अनंतचतुर्दशी ला सार्वजनिक गणेश मंडळाने विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी करण्याचे ठरविले, बोकारे प्लॉट, रामनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस netaji subhashchandra Bose गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी 20 सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणूक काढत, रात्री 10 वाजताच्या दरम्यान इराई नदीजवळ पोहचले.
मंडळातील 3 सदस्य नदीत श्री गणेश मूर्ती ला विसर्जन करण्यासाठी उतरले मात्र त्या 3 सदस्यांचा तोल सुटला व ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले.
विसर्जनस्थळी उभ्या असलेल्या नागरिकांनी दोघांना वाचविले मात्र 28 वर्षीय प्रवीण वनकर हा नदीत बुडाला, रात्रभर प्रवीण चा शोध घेण्यात याला.
त्यावेळी रात्री 2 वाजेपर्यंत उपमहापौर राहुल पावडे व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे सुद्धा शोध मोहिमेला सहकार्य करीत होते मात्र प्रवीण चा पत्ता लागला नाही. Youth drowns in river
आज 21 सप्टेंबरला प्रवीण चा मृतदेह आढळून आला, प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत विसर्जन न करता नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक गणेश मंडळाने त्या दिवशी विसर्जन करणे टाळले मात्र दुसऱ्या दिवशी विसर्जन करणे मंडळाला महागात पडले.
28 वर्षीय प्रवीण हा सलून व्यावसायिक होता.