चंद्रपूर - कोरोनाच्या महामारीत अनेक युवकांचे रोजगार गेले हाताला काम नसल्याने सुशिक्षित तरूण सुद्धा पूर्णपणे खचून गेले होते मात्र अश्या वेळी बल्लारपूर शहरातील "नटवरलाल" Natwarlal ब्रिजेशकुमार बैधनाथ झा याने कोरोना महामारीचे संधीत रूपांतर करीत शहरातील युवकांसोबत लगटपणा करीत मैत्री वाढवीत त्यांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमीष दिले.
रोजगार मिळणार या आशेने युवकांनी झा यांना लाखो रुपये सुद्धा दिले. Chandrapur Zp
झा यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागातील वर्ग 3 च्या कर्मचारी व परिचर या पदाचे तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी काढून त्या युवकांना नियुक्तीचा आदेश जारी केला.
आपल्याला शासकीय नोकरी मिळाली ती सुद्धा जिल्हा परिषद चंद्रपूरला याचा त्या युवकांना आनंद झाला मात्र तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जास्त काळ टिकणारा नव्हता. Fake signature
9 सप्टेंबरला युवक नियुक्ती आदेश घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सेठी यांच्याकडे गेले असता सदर फसवणुकीची बाब उघडकीस आली.
तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार करण्यात आले.
जिल्हा परिषद प्रशासनाने रामनगर पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून युवक-युवतींनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी झा याच्याविरूद्ध भादंवी ४६५, ४६८, ४७१ आणि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, नोकरीचे बनावट आदेश प्रकरणात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
