घुघुस - जिल्ह्यात Online Lottery नंतर सट्टापट्टी चा बेकायदेशीर व्यापार जोमात सुरू आहे, मागील अनेक वर्षांपासून हे अवैध धंदे सुरू असून यावर अजूनही कारवाई करण्यात आली नाही.
Online lottery अजूनही कारवाईपासून दूर असले तरी सट्टा पट्टी वर पोलिसांनी कारवाई करणे सुरू केले आहे, घुघुस येथील गौसिया कॉम्प्लेक्स जवळ 42 वर्षीय शेख हनिफ शेख गणी हे बेकायदेशीर पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून पैसे घेत सट्टा व्यापार करीत होता, पोलिसांना याबद्दल गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी आरोपी शेख हनिफ शेख गणी यांना अटक केली.
महाराष्ट्र जुगार कायद्यांतंर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपिकडून 4 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई घुघुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदरची कारवाई गुन्हे शोध पथकाचे
पोउपनि गौरीशंकर आमटे, नापोशी /महेन्द्र वन्नकवार, पोशि,नितीन मराठे यांनी केली आहे.