राजुरा - राजुरा तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाल्याचे विदारक चित्र सर्वत्र आढळून येत असुन राष्ट्रीय महामार्ग त्याचप्रमाणे तालुक्याला ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते कित्येक ठिकाणी अदृश्य झाले असुन आजच्या स्थितीत रस्त्याला खड्डे पडले नसून खड्ड्यात एखाद्यावेळी रस्ता सापडला तर नवल अशी स्थिती निर्माण झाली असुनही महामार्ग रस्ते विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या बांधकाम विभागाचे अधिकारी ढाराढूर झोपेत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
मात्र रस्त्यांच्या ह्या दुर्दशेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असुन नागरिकांचे नाहक बळी सुद्धा जात आहे तरीही झोपलेल्या अधिकार्यांना जागे करण्याचे व नागरिकांच्या मुलभूत हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले लोकप्रतिनिधी काय करत आहेत हा प्रश्न कायम आहे.
तालुक्यातील रामपूर-माथरा रस्त्यावरील वळणावर सायंकाळी ६ वाजता झालेल्या दोन दुचाकीत two-wheeler collision झालेल्या धडकेत 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर 28 वर्षीय युवकाचे उपचारादरम्यान निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
8-month-old boy was killed
सविस्तर वृत्त असे की, सायंकाळी दरम्यान महेंद्र चित्तलवार हा पत्नी अल्कासह दुचाकीने आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला राजुऱ्याकडे दवाखान्यात येत होते व साखरी येथिल रहिवासी 28 वर्षीय संदीप सुधाकर काटवले हा युवक आपल्या दुचाकीने गावाला निघाला होता.
माथरा गावाजवळील एका वळणावर दोन्ही दुचाकी एकमेकांवर धडकल्याने सर्वजण जोरात पडल्याने चिण्णा महेंद्र चित्तलवार (वय ८ महिने) ह्याचा जागीच मृत्यू झाला तर संदीप सुधाकर काटवले (वय २८) ह्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. महेंद्र चित्तलवार व अल्का चित्तलवार गंभीर जखमी झाले असुन त्यांच्या पायांना जबर दुखापत झाली आहे. जखमी पती पत्नीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
