चंद्रपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीने एकच खळबळ माजली. Anti corruption beuro chandrapur
फिर्यादी याला मेडिकल सर्टिफिकेट साठी लिपिक सलीम शेख याने 50 हजारांची लाच मागितली, फिर्यादीला पैसे द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. Trap chandrapur
लाचलुचपत विभागाने सापळा रचत सलीम शेख याला रंगेहात अटक केली.
Medical college chandrapur
तक्रारदार हे सिंदेवाही तालुक्यातील असून त्यांच्या वडिलांचा मेडिकल फार्म भरून अध्यक्ष वैद्यकीय मंडळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांची सही घेऊन अहवाल देण्याची कामाकरिता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
मात्र फिर्यादीला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला, तक्रारीची पडताळणी केल्यावर 28 सप्टेंबरला लाचेची 50 हजारांची रक्कम स्वीकारताना वरीष्ठ लिपिक सलीम शेख याला रंगेहात अटक करण्यात आली. Bribe
आरोपी शेख हे वरिष्ठ सहाय्यक, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर, जि.चंद्रपूर (वर्ग-3) येथे कार्यरत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर मॅडम,ला.प्र.वि. नागपूर .
मा. श्री मिलिंद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश भामरे पोलीस उपअधीक्षक ,पोनी. शिल्पा भरडे, स. फौ. रमेश दूपारे, पो. हवा. मनोहर एकोनकर, नापोशि संतोष येलपुलवार, अजय बागेसर, रोशन चांदेकर , संदेश वाघमारे, नरेशकुमार नन्नावरे, रवी ढेंगळे, मपोशी.समिक्षा भोंगळे,चालक पोशी.सतिश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.