चंद्रपूर - त्याच्या एका बातमीने देशात खळबळ उडायची, ते गुन्हेगारी विश्वातल्या बातम्या आवर्जून करायच्या मात्र एका बातमीने त्यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
त्यांची चूक इतकी होती त्यांनी लिहलेलं गुन्हेगारी जगतावर पुस्तक लिहलं त्याच नाव होतं Chindi - Rags to Riches या पुस्तकातील कहाणी व शीर्षक छोटा राजन यांच्या नावाने असल्याने त्या पत्रकाराने मोठ्या डॉन चा चिंधी म्हणून उल्लेख केला.
11 जून 2011 Mid-Day दैनिकाचे इन्व्हेस्टीगेशन एडिटर जेडे ऑफिसला जात होते, त्यावेळी पवई येथील हिरानंदानी भागात दुचाकी वाहनावर आलेल्या 2 हल्लेखोरांनी जेडे यांच्यावर तब्बल 5 गोळ्या झाडल्या या हल्ल्यात जेडे यांचा जागीच मृत्यू झाला होता.
जेडे हे पत्रकारितेमधील मोठं नाव असल्याने त्यांच्यावर हा हल्ला का झाला? कुणी केला? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. News34
देशभरात पत्रकारांनी मोर्चे काढत या घटनेचा निषेध केला, मुंबई पोलिसांनी 15 दिवसानंतर 2 शार्प शूटर ला अटक केली, सतीश काल्या व दीपक वाघमोडे यांनी या गुन्ह्यांचे तार अंडरवर्ल्ड शी संबंधित आहे अशी माहिती दिली व या घटनेच्या मुख्य सुत्रदाराचे नाव समोर आले , ते नाव होतं छोटा राजन याचं, मधल्या काळात जेडे यांचं छोटा राजन सोबत बोलणे सुद्धा झाले, मला चिंधी का म्हटलं हा राग राजन यांच्या डोक्यात होता, जेडे यांनी राजनला लंडन येथे भेटण्यास सांगितले मात्र जेडे यांचे संबंध छोटा शकील सोबत असल्याची माहिती राजनला मिळाली, राजन ला वाटले की जेडे छोटा शकील यांच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट आखत आहे अशी माहिती त्याला मिळाली.
राजनने लगेच सतीश काल्या ला संपर्क साधत जेडे याचा गेम करण्यास सांगितले होते, त्यानंतर सतीश ने जेडे यांच्या दिनचर्येची माहिती काढत त्यांची हत्या केली.
पुढे या प्रकरणात एका महिला पत्रकाराचे नाव समोर आले, जेडे यांच्या विरोधात त्या महिला पत्रकाराने छोटा राजन ला भडकाविले होते.
मात्र पुराव्याअभावी महिला पत्रकाराची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
2 मे 2018 रोजी छोटा राजन सहित त्यांच्या 7 साथीदारांना जेडे हत्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आज हीच परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात हळूहळू निर्माण होत आहे, काही पत्रकार प्रामाणिकपणे निडर होऊन लेखणीच्या माध्यमातून पीडित समुदायाला न्याय देण्याच काम करीत आहे मात्र काही वर्षांपासून गुंड प्रवृत्तीच्या पत्रकारांनी जिल्ह्यात धुमाकूळ माजविला आहे.
काही दिवसांपूर्वी डिजिटल माध्यमातील संपादकांनी 2 पत्रकारांना बार मध्ये मारहाण करण्यात आली अश्या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती, चंद्रपुरात तसे पत्रकारांची वाढती संख्या बघता ते मार खाणारे 2 पत्रकार कोण अशी चर्चा गावभर वाऱ्यासारखी पसरली, लेखणीचे उत्तर लेखणीने द्यायला हवे मात्र तसे न होता, डिजिटल माध्यमातील एका पत्रकाराला ती बातमी का प्रकाशित केली म्हणून यासाठी बेदम मारहाण केली.
पीडित पत्रकाराने याबाबतीत पत्रकार परिषद घेत आपली आपबीती कथन करीत दोषींवर कारवाईची मागणी केली. बार मधील मारहाण व बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला मारहाण
या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करायला हवी. कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी काम केल्यास सर्व सत्य समोर येईलचं.
त्यासोबत पोलिसांनी गुंड प्रवृत्तीच्या पत्रकारांवर आळा घालावा, कारण हिंदीत म्हण आहे "एक मच्छली पुरे तालाब को गंदा कर देती है" तस चित्र आज चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये दिसत आहे.
पत्रकारांनी पत्रकारांना धमकी द्यावी व नंतर त्यांना मारहाण करावी हे गैर कायदेशीर कृत्य आहे.
एका घटनेत अंडरवर्ल्ड च्या डॉनला पुस्तकात चिंधी शब्द वापरल्याने त्याची हत्या करण्यात आली होती, जेडे यांचं नाव पत्रकारितेत खूप मोठं होतं.
मात्र चंद्रपुरात पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव सध्या तरी कुनाचं नाही, मात्र या क्षेत्रात आपलं वर्चस्व व दहशत निर्माण व्हावी यासाठी पत्रकारांनी गैर मार्गांचा अवलंब सुरू केला आहे.
अवैध दारू व्यवसायात अनेकदा काही पत्रकारांचे नाव पुढे आले होते, मात्र त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही, आता त्यांची हिंमत वाढली आहे.
तेच पत्रकार आता पत्रकारांविरोधात उठले आहे, कोण कुणावर केव्हा काय करेल याचा काही नेम नाही, आधी पत्रकार "नारदमुनी" ची भूमिका पार पाडायचे आता मात्र डायरेक्ट धमकी व मारहाणीची भाषा करीत आहे. अश्या पत्रकारितेला बळ देणारे सुद्धा पत्रकारचं आहे.
चंद्रपूर जिल्हा सध्या अवैध वसुली, दादागिरी, भाईगिरीने ग्रस्त झाला आहे व आता यामध्ये भर टाकण्याचे काम काही पत्रकारांनी केले आहे, लेखणीच्या आड पत्रकार गुंड प्रवृत्तीचे झाले आहे, असल्या गुंड प्रवृत्ती ला प्रामाणिक पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ठेचून काढायला हवे, अन्यथा उद्या मारहाणीचा प्रयोग गुंड प्रवृत्तीचे पत्रकार तुमच्यावरही आजमावतील.
चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने त्या अवैध कार्याच्या गुंड पत्रकारितेचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अन्यथा पुढच्या काळात चंद्रपूर शहरात पत्रकारांचा "जेडे" व्हायला वेळ लागणार नाही.