कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
         कोरपना नगरपंचायत नगरसेवक सुहेल अली यांची कोरपना राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सदर नियुक्ती केली आहे.धडाडीचे कार्यकर्ते म्हणून सुहेल अली यांची ओळख असून यावेळी वैभव गोरे,आकाश वऱ्हाटे,सदानंद गिरी,मयूर एकरे,आसीफ केडीया,आदित्य मासीरकर,प्रविण प्रविण जाधव,विकास टेकाम इतर राकाँ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. NCP Korpana
       सुहेल अली यांच्या नियुक्तीने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत असून तालुक्याच्या ठिकाणी पक्षाने युवकाला संधी देऊन मोठी जबाबदारी दिली आहे.संपर्कमंत्री ना.प्राजक्ता तनपुरे,जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य,रायुकाँ जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके,विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे,राकाँ तालुकाध्यक्ष शरद जोगी यांचे सुहेल अली यांनी आभार मानले आहे. "२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण" राकाँच्या या ध्येयधोरणा प्रमाणे शेवटच्या घटकांचे कल्याण,युवकांचे संघटन बांधणी व पक्षाचे कार्यक्रम राबविण्याला अधिक प्राधान्य देऊ असे मत नवनियुक्त रायुकाँ तालुकाध्यक्ष सुहेल अली यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
