मुंबई/चंद्रपूर - ना .ग .आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालय चेंबूर, मुंबईच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन (आभासी व्यासपीठ) गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, सदर स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. Singing competition Chembur
प्रथम फेरी मनभावन सावन दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी, द्वितीय फेरी नटखट सावन दिनांक 24 ऑगस्ट 2021 व अंतिम फेरी दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत एच. व्ही.के तन्ना कनिष्ठ महाविद्यालय घाटकोपर ,मुंबई येथील कु,कामरीन कैकशा मोहम्मद उबेर हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील कु, स्नेहल सुनील शिरसाट ही द्वितीय आणि ना.ग .आचार्य आणि दा .कृ. मराठे महाविद्यालय चेंबूर मुंबई येथील कु,भूमी अनिल जाधव ही तृतीय पारितोषिकाची मानकरी ठरली. याप्रसंगी परीक्षक म्हणून अनघा ढोमसे( इंगळे), दिलीप मेजारी, वैशाली दरेकर, के. शिरीष, केतकी गोरे, प्रा. अनिता दाभोळकर व प्रा. संदीप खंडीभरव यांनी कामकाज पाहिले. चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी शैलेश आचार्य, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विद्यागौरी लेले, उपप्राचार्या सविता चोप्रा, पर्यवेक्षिका जयश्री जंगले, श्रीजा नायर व पर्यवेक्षक कोंकणे, निबंधक संगीता गुरव व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचे काम कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. वंदना गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकिशोर गोसावी, प्रा. तेजल आवारे, प्रा.हर्षाली वळवी यांनी केले. सांस्कृतिक विभागाचे सदस्य प्रा. नंदकिशोर गोसावी , प्रा.प्रल्हाद पाटील , प्रा. प्रकाश गीते, प्रा. विष्णू घायाळ, प्रा. सुजित जाधव, प्रा.तेजल आवारे, प्रा. हर्षाली वळवी, प्रा. सुषमा खरात, प्रा. प्रियंका काळढोणे, प्रा. राजश्री चव्हाण, हर्षदा शेट्टी यांनी सहकार्य केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश देण्यात आला. विजेत्यांचा भेट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.
