चंद्रपूर - राज्यात युवा सेना पदाधिकारी संवाद दौऱ्यासाठी निघालेले युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचं आज चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले. Shivsena chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना-युवासेना पक्षाच्या संघटन बांधणी आढावा व पदाधिकारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमानंतर सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Yuvasena chandrapur
सरदेसाई यांनी माहिती देताना सांगितले की चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना व युवासेना आजच्या घडीला मजबूत स्थितीत आहे, राज्यात मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुजू झाल्यावर ते राज्यात नाहीतर आज संपूर्ण देशात लोकप्रिय झाले.
कोरोना काळात त्यांनी अनेक समस्यांना नम्रपणे सामोरे जात कोरोनाची भीषण परिस्थिती योग्य रित्या हाताळली.
News34
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश नक्की मिळेल.
शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे हे युवा असून त्यांनी आपल्या कार्याची छाप चंद्रपूर जिल्ह्यात उत्तम प्रकारे पाडली असून त्यांच्या नेतृत्वात स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना बाजी मारेल.
आयोजित पत्रकार परिषदेत युवा सेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम, शिवसेना चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे, युवासेना समनव्यक विक्रांत सहारे आदींची उपस्थिती होती.