चंद्रपूर - भारताचे भूतपूर्व युवा पंतप्रधान माहीती तंत्रज्ञान युगाचे उदगाता तथा भारताला जगातील महाशक्ती बनविण्याचा संकल्प करून त्या दिशेन विकासाचा मार्गकमन करणारे भारतरत्न स्व राजीवजी गांधी यांची आज 77 वा जयंती दिन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थित चंद्रपूर जिल्हा एन.एस.यु. आय वतीने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करुन साजरा करण्यात आला. Bharat ratna rajiv gandhi
राजीव गांधी समागृह चंद्रपूर येथे मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला मा. नरेशबाबूनी पुष्पहार अर्पण केला. व उपस्थित सर्वांनी पुष्पार्पण करून राजीवजींना आदरांजली वाहीली व रक्तदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. News 34
रक्तदानाच्या महान- दान कार्याचा प्रारंभ एन.एस.यु. आय चंद्रपूर जिल्ह्याचे निरिक्षक श्री मारका अभिनय गौड, विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसचे चंद्रपूर शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, एन.एस.यु आय चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री स्वप्नील तिवारी, कामगार युनियनचे नेते श्री गजानन दिवसे यांनी रक्तदान करून स्व. राजीवजीच्या 77 व्या जयंती निमित्त कृतीशील आदरांजली वाहीली.
आपल्या प्रमुख मार्गदर्शनात आदणीय बाबूजी म्हणाले भारतरत्न स्व. राजीवजी गांधी हे भारताचे पहिले युवा पंतप्रधान होते. आजच्या विज्ञान युगात राजीवजी माहीती व तंत्रज्ञान तसेच संगणक युगाचे उदगाता ठरले, पंचायत राजच्या माध्यमातुन त्यांनी ग्रामिण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा शेवटच्या घटकाचे जीवनमान उंचावन्याचे प्रयत्न निरनिराळ्या ग्रामिण योजानांच्या माध्यामातुन केले विज्ञान, कृषी, सिंचन उद्योग, शिक्षण, संरक्षण इत्यादी सर्वच क्षेत्रात प्रगतीचे सर्वोच्च टप्पे गाठण्याचा व देशाला महासत्ता बनविण्याचे प्रयत्न त्यांच्या काळातच झाले.
रक्तदान कार्यक्रमानंतर सर्व रक्तदात्यांना रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता झाली. रक्तदान कार्यक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेटी अधिकारी डॉ. अनंता हजारे यांच्या मार्गदर्शनात डॉ. खिचड़े, डॉ. पंकज पवार श्री उत्तम सावंत यांचा टिमने सहकार्य केले.
या कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर ग्रामिण अध्यक्ष गजाननराव गावडे, मनपा नगरसेवक श्री अशोक नागापूरे, एन.एस.यु आये चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष शफाख शेख, युवक काँग्रेसचे दुर्गेश चौबे, इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, एन.एस.यु. आय चंद्रपूरचे पदाधिकारी प्रतिक तिवारी, प्रतिक हरणे, स्नेहल चालुरकर राजु यादव, किष्णा यादव, बेनल पाल, शैलेश गिरडकर, प्रियंका नंदुरकर, अचित आवेकर, अंकित तुपसुंदर कामगार युनियनचे अनिल तुगीडवार, विरेंद्र आर्या, सुभाष माथनकर, आशिष मोहाता, सुदर्शन पुल्ली, राजेंद्र शुक्ला, सुनिल बकाली, उमेश कोलावार, काँग्रेसचे सुधाकरसिंह गौर, रतन शिलावार, विनोद पिंपळशेंडे, श्रीनिवास पारनदी, अजय महाडोळे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.