प्रतिनिधी/गुरू गुरनुले
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या थकीत वीज बिलामुळे ग्रामपंचायतींचे कनेक्शन कापण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामपंचायतींचे पथदिव्यांचे विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थरावर नागरीकामध्ये असंतोष पसरला होता. यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक होते. ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारचे नियमित ठोस असे आर्थिक उत्पन्न नसल्याने राज्यातील अनेक ग्रामपंचायती सदर बिलाची रक्कम भरण्यास अडचण निर्माण झाली होती पथदिव्यांचे विद्युत देयकांची रक्कम यापूर्वी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे महावितरण कंपनीकडे भरणा करण्यात येत होता. यापुढेही ग्रामपंचायतीच्या बिलाची रक्कम ग्रामविकास विभागाकडून भरणे गरजेचे आहे. ग्रामीण जनतेला अंधारात ठेवणे हा काही पर्याय नाही. ग्रामपंचायतींचे उत्पन्न सुद्धा नगण्य आहे.
यावेळी संतोष रावत अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्वर्ती बँक ,तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर राकेश भाऊ रत्नावार, अखिल गाग्रेडीवार सरपंच भेजगाव, चंदू पाटील मारकवार ,सरपंच राजगड हिमानी ताई वाकुडकर सरपंच नांदगाव, राहुल मुरकुटे उपसरपंच, दुर्वास कडस्कर उपसरपंच चिखली आणि मुल तालुक्यातील बरेचसे कार्यकर्ता गण उपस्थित होते.
