चंद्रपूर - मागील 5 ते 6 वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात Online लॉटरी चा बेकायदेशीर धंदा सुरू आहे, मात्र या अवैध धंद्याला News34 च्या माध्यमातून चांगलीच चपराक मिळाली.
या अवैध धंद्याचा भांडाफोड News34 ने केल्यावर प्रशासनाने तात्काळ हे साम्राज्य बंद केलं, मात्र 1 आठवडा बंद ठेवल्यावर "मी पुन्हा येईन" म्हणत हा धंदा पुन्हा सुरू करण्यात आला.
पण का? या प्रश्नाचे उत्तर खूप मोठं सस्पेन्स आहे, मात्र News34 त्या Suspenss वरून लवकर पडदा उचलणार आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 227 ठिकाणी अवैध ऑनलाइन झटपट लॉटरी चा व्यवसाय अविरत सुरू आहे.
या अवैध धंद्याला पाठबळ कुणाचं? बेकायदेशीर धंदा बंद झाल्यावर कुणाच्या सांगण्यावरून पुन्हा सुरू करण्यात आला? याच उत्तर आपल्याला सध्या तरी मिळणे कठीण आहे.
बंद पडद्याआड चालणारे हे धंदे व त्यामागे असणारे पाठबळ, सोबत भानापेठ भागात राहणारे इंजिनियर संजय व गणेश ह्या दोघांना सध्या प्रशासनामार्फत दुकाने सुरू करण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे.
या बातमीनंतर प्रशासन ह्या अवैध व बेकायदेशीर साम्राज्याला बंद करणार की पाठबळ देणार याकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे.
बातमीच्या पुढच्या भागात या धंद्याला पाठबळ देणारा याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
