मुल- नगर परिषदेच्या निवडणुका डिसेंबर महिन्या पर्यंत होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करताच मुल येथील राजकीय पक्षातील राजकीय घडमीडिला वेग येत असून सर्वच पक्ष मोर्चे बांधणीच्या पूर्व तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. मुल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे , महेशभाऊ चौधरी ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक 1 येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले . सदर बैठकी मध्ये वार्डातील बहुसंख्य युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांची वार्ड कार्यकारणी करण्यात आली.
सदर बैठकीत संदीप धारणे ,संदीप सोनुलवार, गणेश कुमरे, सुरेश चौधरी, नामदेव डंकेवार, अतुल कुंभरे,अमित चौधरी,विश्वनाथ चौधरी, विनोद धारने, शंकर रेकलवार, ज्ञानेश्वर गुरनुले, पियुष चौधरी, सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी, सागर आकुलवार, गणेश चौधरी, उमेश कुमरे,मनोज नरुले, दिलीप चौधरी,चेतन गाजुलवार ,अभिषेक वाकडे, जय धारने, बंदीरा श्रीरामे, ज्ञानेश्वर गुरनुले, दीपक अन्नावार,इत्यादी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला. News34
युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन सुमित भाऊ समर्थ यांनी केले. तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करु असे भास्कर खोब्रागडे व महेश जेंगठे यांनी सुद्धा युवकांना मार्गदर्शन केले !