ऊर्जानगर(चंद्रपूर) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॅा.नरेंद्र दाभोळकर यांचा दि.२० आगस्ट २०१३ ला सकाळी मॉर्निग वॅाकवरून परत येताना त्याच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.त्या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाली.परंतु अजूनही खुनी सापडले नाही खुण्याला पकडण्यास सरकारला अपयश आले ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे अशी खंत कार्यकर्त्याकडून व्यक्त करण्यात आली. या खुन्याचा लवकरात लवकर तपास यंत्रणेने करावा असा ईमेल मा पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालय करण्यात आला आहे. Narendra Dabholkar
त्यांच्या स्मृतिदिन हा सर्वत्र राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा झाला त्यनिमित्य महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी शहीद डाँ नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले व यावेळी खालील घोषणा ही देण्यात आल्या.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, अमर रहें, अमर रहें.
कॉ. गोविंद पानसरे, अमर रहें, अमर रहें.
प्रा. एम. एम. कलबुर्गी, अमर रहें, अमर रहें
फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर
उठ माणसा जागा हो, अंनिसचा एक धागा हो
हल्लेकरांनो हाय हाय, विवेकाचा आवाज संपणार नाय, आवाज दो, हम एक है, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे.
पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे.
कलबुर्गींच्या मारेकऱ्यांना अटक, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. विवेकाचा आवाज, बुलंद करूया
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा ऊर्जानगरच्या वतीने वसाहतीतील आंभोरा चौकात गणपती विसर्जन परिसरात दुपारी सर्व पदाधिकारी समवेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव, जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण, नरेंद्र रहाटे तसेच ऊर्जानगर शाखेचे कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर, उपाध्यक्ष मुरलीधर राठोड,महिला प्रतिनिधी जाधव मॅडम, लीनाताई चिमुरकर, किशोर मुगल,राजा वेमुला ,बालकुमार सोमलकर, विजय राठोड , सिद्धार्थ चिमुरकर, तुषार चव्हाण तसेच अंनिसचे पदाधिकारी व सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.