News 34 chandrapur
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील मौजा टेकाडी येथील शेतकरी आपले गुरे चारण्यासाठी टेकाडी सादागड बिटातील वन कक्ष क्रमांक ३०५ गावाला लागूनच असलेल्या जंगलात नेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने घाटू वडगू भोयर वय (७०) या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले होते. याबाबतची माहिती टेकाडी येथील ग्रांमस्थानी व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व जि. प.माजी अध्यक्ष संतोषशिंह रावत यांना दिली असता मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून दहा हजार रुपये मृतक घाटू वडगू भोयर यांचे नातेवाईक विलास धोंडू भोयर यांना आर्थिक मदतीचा चेक अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ग्रावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतकांच्या घरी जाऊन दिला. News34 कुटुंब प्रमुख गेल्याने निराधार झालेल्या कुटुंबीयांना बँकेतर्फे आर्थिक आधार देतांना अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या समवेत तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व बाजार समिती संचालक राकेश रत्नावार, माजी सरपंच बापूजी कोटरगे, सदश गणपत जराते, मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष. अरविंद बोरूले, माजी उपसरपंच निर्मला जराते, किसन भोयर, तायरअल्ली सय्यद, शंकर भोयर, दौलत शेंडे, रामदास शेंडे, नत्थु गोहणे, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. Cdcc bank chandrapur
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत अनेक कँसरग्रस्त रुग्णांना, हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांना तसेच गंभीर दुर्धर आजार झालेल्या रुग्णांना उपचारासाठी चाळीस हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा आधार दिला आहे. आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात साप चावून,विंचू चावून,व वीज पडून मृत्यू पावलेल्या तसेच धानाचे पुंजने जळालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी बँक निराधारांच्या घरी जाऊन मदतीचा आधार दिला आहे.