चंद्रपूर - मागील अनेक वर्षांपासून चंद्रपुरातील जनता ही रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्रस्त झाली आहे, शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती वेळोवेळी व्हायला हवी मात्र महानगरपालिका त्या खड्ड्यात फक्त माती (भरन) भरण्याचे काम करीत आहे, त्या मातीने निघणारी धूळ व प्रदूषणात होणारी वाढ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहे.
शहरातील खड्ड्यावर निव्वळ प्रसिद्धीसाठी आंदोलन केले जातात मात्र त्याचा पाठपुरावा कुणी करीत नाही.
महानगरपालिका निवडणुकीत काही नागरिक लोकशाहीचा अधिकार 500 रुपयात विकून जनप्रतिनिधींची निवड करतो तर रस्त्यात खड्डे दिसणारचं.
चंद्रपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी खड्ड्यांचा कायम तोडगा निघावा यासाठी आंदोलनाची सुरुवात केली.
आज फुसे यांनी महाकाली मंदिर ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय रोड परिसरातील खड्ड्यासमोर आंदोलन करीत "500 मे बिक जाओगे तो ऐसाही रोड पाओगे" अश्या घोषणा केल्या. News 34
यावेळी फुसे यांनी महानगरपालिकेच्या शून्य नियोजन कारभारावर नाराजी व्यक्त केली, नागरिक न चुकता पालिकेचे कर भरतो मात्र हे सर्व करून सुद्धा त्यांना असे खड्डेमय रस्ते मिळत असतील तर मत टाकून काय उपयोग? असा प्रश्न नागरिकांसाहित त्यांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून विचारला.
सामाजिक कार्यकर्ते फुसे यांनी सुरू केलेले हे आंदोलन अनोख्या पद्धतीचे असले तरी या आंदोलनाचा नागरिकांवर काय परिणाम पडणार हे येणाऱ्या पालिका निवडणुकीत दिसेलचं.